आमदार शेखर निकम व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश
चिपळूण:- तालुक्यातील तळसर येथील गव्यारेड्याच्या हल्यात मृत पावलेल्या तुकाराम बडदे यांच्या कुटुंबियांना वन विभागाकडील २० लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश नुकताच तुकाराम बडदे कुटूंबियांकडे आ. शेखर निकम यांनी वन विभागाचे अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत सुपूर्द केला.
तळसर येथील तुकाराम बडदे यांच्यावर २३ एप्रिल २३ रोजी गव्यारेड्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्यात ते गंभीर प्रमाणात जखमी झाले होते. त्यांच्यावरती अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे ७ ते ८ दिवस उपचार सुरू होते. परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे.
मृत तुकाराम बडदे यांच्या वारसांना शासनाच्यावतीने दिली जाणारी मदत तातडीने मिळावी, यासाठी आमदार शेखर निकम व वन विभागाचे अधिकारी यांनी शासनाकडे पाठपुरावा करून २० लाखांची मदत प्राप्त करून घेतली.
आमदार शेखर निकम, वन विभागीय अधिकारी दिपक खाडे, वनपाल चिपळूण राजेश्री किर, सहाय्यक वनरक्षक वैभव बोराटे, वनपाल चिपळूण दौलत भोसले, वनक्षेत्रपाल रामपूर राजाराम शिंदे, वनरक्षक कोळकेवाडी राहुल गुंठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, प्रदेश सचिव जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष अबु ठसाळे,मुंढे सरपंच मयुर खेतले, मिडीयाध्यक्ष सचिन साडविलकर उपस्थितीत तुकाराम बडदे यांची पत्नी पार्वती तुकाराम बडदे व कुटुंबियांकडे १० लाखांचा धनादेश व ५-५ लाखांची एफडी प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात आली.
ही मदत तातडीने मिळावी यासाठी विभागीय वनाधिकारी चिपळूण दिपक खाडे, परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री किर, सहाय्यक वनरक्षक चिपळूण वैभव बोराटे व वन विभागाचे कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी तळसरचे सरपंच सिद्धी पिटले, रविंद्र म्हादे, माजी सरपंच राजेंद्र राजेशिर्के, श्रीकांत जाधव, राजेंद्र जाधाव, साहील गुरव, श्याम खेतले, सुर्यकांत पिटले, पोलीस पाटील महेंद्र कदम, वन विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
तळसर येथील गव्यारेड्याच्या हल्ल्यातील मृत तुकाराम बडदे यांच्या वारसांना २० लाखांची मदत
