संगलट,खेड/इक्बाल जमादार:-चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचे माजी सरपंच व जिल्हा शांतता समितीचे सदस्य तसेच अनेक पदावर काम करणारे श्री.शौकत माखजनकर यांची संजय गांधी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सदरची निवड पालकमंत्री साहेब यांच्या शिफारशीनुसार व मा.आमदार श्री.शेखरजी निकम यांच्या प्रयत्नामुळे नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी संजय गांधी समितीमध्ये २०१४ मध्ये सदस्य या पदावर काम केले यावेळी हजारो गोरगरीब लोकांना या योजनेचा पुरेपूर फायदा मिळून दिलेला आहे नियमित सामाजिक कामात सतत अग्रेसर असतात.
सावर्डे गावचे सरपंच,उपसरपंच,व सदस्य ग्रामपंचायत मध्ये वीस वर्ष पदावर काम केले आहे जिल्हा शांतता समिती सदस्य, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य उपसभापती, या पदावर काम करत होते जिल्हा ओबीसी संघटना अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे कमिटीवर सदस्य चिपळूण मुस्लिम समाज चिपळूण उपाध्यक्ष अशा अनेक पदावर काम केले आहे त्याचा फळ म्हणून संजय गांधी योजनेच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी मा.आमदार श्री.शेखरजी निकम साहेब यांच्या प्रयत्नामुळे या पदावर निवड झाली आहे.
या पदाचा उपयोग योजनेतील वंचित गोरगरीब होतकरू गरजू लोकांना याचा पुढेपुर फायदा तालुक्यातील लोकांना सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना बरोबर घेऊन काम करण्याचे आवाहन देण्यात करण्यात आले.
मा.आमदार शेखरजी निकम साहेब व प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी सावर्डे गावचे सरपंच सौ. समीक्षा बागवे,उद्योजक केतन शेठ पवार उपसरपंच जमीर मुल्लाजी,सोसायटी चेअरमन सूर्यकांत चव्हाण,माजी सभापती श्री.विजयराव गुजर,माजी सरपंच श्री.बाळुशेठ मोहिरे,तंटामुक्त अध्यक्ष श्री.बाबुशेठ चव्हाण,श्री.तुकाराम साळवी,श्री. विजय भुवड,श्री.भोसले,श्री. विश्वास गुरव, ग्रामपंचायत सदस्य सावंत श्री.निवृत्ती जाधव,श्री. रफिक भाई मुल्लाजी,मिरअली सय्यद,नासीर भाई अडरेकर व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याचप्रमाणे जमातुल मुस्लिमीन अडरेकर मोहल्ला सावर्डे व अल अमीन कमेटी अडरेकर मोहल्ला व लब्बेक कमिटी सावर्डे यांच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.