संगमेश्वर:- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ विद्यार्थिनींच्या मेहंदी रेखाटन स्पर्धेने झाला. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ही शुभारंभाची स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेसाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ व ‘पर्यावरण संवर्धन’ हे दोन महत्वपूर्ण विषय देण्यात आले होते. या मेहंदी स्पर्धेचे परीक्षण प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. देवयानी जोशी, प्रा. संचिता चाळके, प्रा. मधुरा मांगले यांनी केले. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
प्रथम क्रमांक- पायल राजेश कासेकर (१२वी एम.सी. व्ही.सी.).
द्वितीय क्रमांक- श्रद्धा शशिकांत बांडागळे (१२वी वाणिज्य).
तृतीय क्रमांक-
नमिरा जुबेर शेख (१२वी एम.सी. व्ही.सी.).
उत्तेजनार्थ-
रिजा शरिफ साटविलकर (१२वी वाणिज्य)
नवरात्र महोत्सवातील विविध पारंपारिक, मनोरंजनात्मक आणि उद्बोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष, सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. मेहंदी रेखाटन स्पर्धेबाबत बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर म्हणाले की, मेहंदी ही आपल्या संस्कृतीची पारंपारिक कला असून, या कलेचे जतन करण्याकरता महाविद्यालयात अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशाच स्पर्धातून पुढे येऊन अनेक विद्यार्थ्यांनीनी विद्यापीठ स्पर्धांसह विविध नावाजलेल्या स्पर्धांमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. अनेक विद्यार्थिनींनी ही कला विविध कौशल्यांसह आत्मसात करून अर्थाजनाचा मार्ग निवडला असून महाविद्यालयासाठी हे भूषणावह आहे.
नवरात्र महोत्सवातील विविधांगी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. सुवर्णा साळवी, प्रा. सानिका भालेकर, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. सीमा कोरे, प्रा. गायत्री जोशी, प्रा. रीहा चव्हाण आणि सहाय्यक आश्लेषा इंगवले मेहनत घेत आहेत. मेहंदी डिजाइन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.