संगमेश्वर/इक्बाल पटेल:-संगमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कसबा शास्त्रीपुल येथे चोरट्या पध्दतीने अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांनी पोलीस स्टाफसह तत्काळ शास्त्रीपुल येथे जावून सापळा लावुन ४ आरोपीना मुद्देमालासह संगमेश्वर पोलिसानी रंगेहात पकडले आहे.
या कारवाईत आरोपी १) अजय राजेंद्र काणेकर, वय ३८ वर्षे, २) सौ. अक्षरा अजय काणेकर, वय ३६ वर्षे, दोघे रा. असगोली,मधलीवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, ३) मुस्ताक इब्राहिम मुल्लाजी वय ५६ वर्षे, कसबा शास्त्रीपुल ता. संगमेश्वर, ४) कामील हसन मुल्ला, वय ४८ वर्षे, रा. डिंगणी,मोहल्ला ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी यांना पकडून त्यांच्याकडून रु. ३,००,०००/- किंमतीचा चरस अंमली पदार्थ व मोटारसायकल असे एकूण रु. ३,४०,०००/- रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यातील आरोपी यांच्यावर संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. ८६/२०२३, अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) सह २० (ब), (ii) (A), २२ (ब), भा.दं.वि.क. ३४ अन्वये दि. ०९/१०/२०२३रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक रत्नगिरी धनजंय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. गावीत, सपोफौ / ९२५ साळवी, सपोफौ /२४० कांबळे, पोहेकॉ/१४३० कामेरकर, पोहेकॉ/१४०२ जोयशी, पोहेकॉ/७०७ कोलगे, पोना/९०१बरगाले, पोना/१२७३ मनवल, मपोना/१५२५ धामणस्कर, पोकॉ/३९ आव्हाड, पोकॉ/१६२० रामपूरे, व मपोकॉ/१५७३ वसावे यांनी केलेली आहे. अधिक तपास पोनि/- गावीत करीत आहेत.