चिपळूण/ओंकार रेळेकर- शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच महाराष्ट्राला नवी दिशा देऊ शकतात,त्यांच्या हातातच महाराष्ट्र सुरक्षित राहील.असा ठाम विश्वास व्यक्त करत चिपळूण शहरातील कावीळतळी येथील उच्चशिक्षित युवकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.क्षेत्रप्रमुख बाळा कदम,शहरप्रमुख शशिकांत मोदी,यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
चिपळूण शहराचे तत्कालीन शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शहर शिवसेनेत काही अंशी पोकळी निर्माण झाली होती.परंतु तात्काळ त्याजागी अनुभवी असे शशिकांत मोदी यांची शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि मोदी यांनी देखील तात्काळ कामाला सुरुवात देखील केली.उपशहरप्रमुख सचिन (भय्या)कदम यांना बरोबर घेऊन त्यांनी शहराच्या उपनगर भागात लक्षकेंद्रित केले होते.भय्या कदम या भागात गेली कित्येकवर्ष शिवसेनेचे काम करत असून तरुणांची एक मोठी टीम त्यांच्याकडे आहे. त्याअनुषंगाने भय्या कदम यांनी यावेळी उच्चशिक्षित युवक वर्गाकडे संपर्क ठेवला होता.राजकारणात सुशिक्षित तरुणांची फार मोठी गरज असल्याचे व उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे तरुणांचे भविष्य घडवू शकतात हे भय्या कदम यांनी या उच्चशिक्षित तरुणांना पटवून दिल्यानंतर शहरातील कावीळतळी येथील तरुणांचा एक मोठा गट शिवसेनेकडे आकर्षित झाला.सुमारे २५ ते ३० युवकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी सायंकाळी क्षेत्रप्रमुख बाळा कदम शहरप्रमुख शशिकांत मोदी,उपशरहरप्रमुख भय्या कदम,युवसेना शहरप्रमुख पार्थ जागूष्टे यांनी या सर्व युवकांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्यामध्ये इंजिनिअर, वकील,टेक्निशियन, व्यवस्थापक,असे पदविप्राप्त तरुणांचा भरणा असून पदवीधर युवक देखील मोठ्या प्रमाणात आहेत.कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले काम आम्हाला भावले,त्यांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित राहू शकतो ही आमची खात्री झाली,आदित्य ठाकरे महाराष्ट्राला नवी दिशा देऊ शकतात,हा विश्वास आम्हाला आहे.म्हणूनच आम्ही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असल्याचे प्रवेशकर्ते तरुण यावेळी म्हणाले.
पक्षाकडून त्यांना बळ दिले जाईल-कदम
ज्या विश्वासाने या उच्चशिक्षित तरुणांनी पक्षात प्रवेश केला आहे.त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही.कोणतीही अपेक्षा न ठेवता जेव्हा हे तरुण पक्षात तेव्हा आमची देखील जबाबदारी वाढली आहे.त्यांना पक्षाकडून बळ दिले जाईल.त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.या उच्चशिक्षित तरुणांचा पक्षप्रवेश साहजिकच चांगला संदेश देणारा असल्याचे बाळा कदम यावेळी म्हणाले.