संगमेश्वर:- तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये ग्रामपंचायत मध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे अशा प्रकारे चालत असलेले भ्रष्टाचार थांबवण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील मुचरी, मौजे असुर्डे आणि कोळंबे सोनगिरी या गावातील स्थानिक ग्रामस्थ व मुंबईकर यांनी पुढाकार घेऊन संगमेश्वर तालुका भ्रष्टाचार निर्मुलन संस्था स्थापन केली आहे.
सध्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार होताना आपल्याला बघायला मिळत आहेत, आणि त्यामुळे गावातील सर्वसामान्य लोकांवर अन्याय होताना आपल्याला बघायला मिळतो या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ही संस्था स्थापन करत आहोत असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या संस्थेची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे त्यामध्ये
अध्यक्ष- श्री.मनोहर मुंडेकर , उपाध्यक्ष – श्री.विलास सुर्वे , सचिव – श्री.प्रणिल पडवळ,श्री. बाळकृष्ण महाडिक, उपसचिव – श्री.मंगेश पाताडे, खजिनदार – खंडेश कासार , सह खजिनदार – प्रणाली प्रदीप शिंदे, शोभा नरेश गवळी, सल्लागार – श्री.महेश रसाळ , श्री.प्रदीप मोहिते,
सदस्य-
श्री.इम्रान झारी,
श्री. सखाराम जोशी,
श्री.राजेंद्र टाकळे,
श्री.अशोक तांबे,
श्री.प्रदीप शिंदे,
श्री. सुरेश महाडिक,
श्री.संतोष नागलेकर,
श्री.नरेश गवळी,
श्री. महेंद्र महाडिक,
श्री.विनेश टाकळे,
श्री. निलेश भालेकर,
श्री.अनंत पडवळ.
श्री.किशोर जाधव.
यांची निवड करण्यात आली आहे.तसेच संगमेश्वर तालुक्यातील सरकारी व निमसरकारी कार्यालयात होत असणारे भ्रष्टाचार त्याची पालंमुळं खणून काढण्यासाठी ही संस्था सदैव कटिबद्ध असेल असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तसेच तालुक्यातील इतर गावांमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल तर त्यांनी सुद्धा या संस्थेमध्ये समाविष्ट होण्याचं आवाहन या संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.