मुंबई:- लोकलला मुंबईकरांची लाईफलाईन समजलं जातं. ज्या दिवशी मुंबई लोकलच्या एखाद्या मार्गावर मेगाब्लॉक लावला जातो तेव्हा मुंबईकरांची तारांबळ उडते. मात्र, मुंबईकरांच्या लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली आहे.
सुदैवाने या दगडफेकीत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. बोरिवली लोहमार्ग पोलिसांना याबद्दल माहिती प्राप्त होताच त्यांनी घटस्थळावर जाऊन पाहणी केली.
चर्चगेट ते विरार या दोन स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकलवर दगडफेक झाल्याची घटना घडली. जेव्हा ही लोकल कांदिवली आणि बोरिवली या स्थानकांमध्ये धावत होती, तेव्हा ही दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांनी घडली. याव दगडफेकीत एसी लोकलच्या जवळपास पाच ते सहा खिडक्या तुटल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या दगडफेकीत सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
मात्र, एससी लोकलवर दगडफेक करणारे समाजकंटक कोण आहेत?याचा तपास बोरिवली लोहमार्ग पोलीस करत आहे.