गुहागर:-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियान शनिवार दिनांक.३० सप्टेंबर २०२३ रोजी गुहागर तालुक्यातील वेळंब येथे सदर उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. निमित्ताने ग्रामपंचात वेळंब तर्फे अमृत कलश यात्रा काढण्यात आली होती. आपल्या माती विषयी जनजागृती प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी तसेच देशासाठी शहीद झालेल्या शुर विरांचा सन्मान व्हावा प्रति हे अभियान राबविण्यात आले होते.
सकाळी १० वा.पासून अमृत कलश यात्रेला गावातील घाडेवाडी- जूवेवाडी येथून सुरुवात करण्यात आली.सदर यात्रेत सरपंच समीक्षा बारगोडे ग्रामविकास अधिकारी मंगेश पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव, सदस्या श्वेताली घाडे, जयश्री जाधव तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सहभाग घेऊन एक मुठमाती कलशा मध्ये समर्पित करीत मातीला नमन व विराना वंदन करण्यात आले.