संगलट,खेड/इक्बाल जमादार:-रत्नागिरी जिल्हा कब्बड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनच्यावतीने ३४ वी किशोर/ किशोरी गट तालुका अजिंक्यपद कब्बड्डी स्पर्धा नुकतीच कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवभारत हायस्कूल,भरणे येथील मैदानावर नुकतीच संपन्न झाली. खेड तालुक्यातील असोसिएशन संलग्न एकूण आठ संघानी सहभाग घेतला.
यामध्ये काळकाई कला, क्रीडा केंद्र भरणे या संघाने विजेतेपद,अनसपुरे या संघाने उपविजेते,झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली तृतिय तर जय गणेश क्रीडा मंडळ खेड यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. विजेता उपविजेते संघाना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भरणे गावचे माजी सरपंच तथा संस्थेचे खजिनदार श्री. राजाभाऊ बैकर, मुरडे हायस्कूल मुख्याध्यापक श्री. अरुण शिंदे, खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री.दाजी राजगुरू, सहसचिव तथा तालुका पंच नियुक्ती प्रमुख श्री.शरद भोसले, राष्ट्रीय पंच श्री.पांडुरंग विठ्ठल, राज्य पंच श्री.सुजित फागे, श्री.संतोष शिर्के, श्री.उल्हास शेलार, श्री.महेश मर्चंडे, श्री.स्वप्निल बैकर, यांचेसह श्री.रुपेश तरडे, श्री.सुरज जाधव, श्री.आशिष शिंदे, श्री.समीर देवळेकर, कु.अथर्व धुमाळ, कु.रितेश बिर्जे, इतर मान्यवर व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धेचे निरीक्षक श्री. दाजी राजगुरू तर पंच प्रमुख श्री.संतोष शिर्के, पंच श्री.महेश मर्चंडे, श्री.स्वप्नील बैकर यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेसाठी निवड समिती सदस्य म्हणून श्री. अमोल दळवी, श्री.उल्हास शेलार, श्री.सुरज जाधव यांनी तर छाननी समितीसाठी श्री.विशाल खेडेकर, श्री.स्वप्नील बैकर यांनी सहकार्य केले.
हि अजिंक्यस्पर्धा यशस्वीतेसाठी खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कब्बड्डी असोसिएशन उपाध्यक्ष श्री.सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, सचिव श्री. रवींद्र बैकर, उपाध्यक्ष श्री. महेशराव भोसले, उपाध्यक्ष श्री.आनंद उर्फ भाई हंबीर, कार्याध्यक्ष श्री.समंदभाई बुरोंडकर, कार्यकारणी सदस्य श्री.सुभाष आंबेडे, श्री. दिपक यादव, श्री दिलीप कारेकर, श्री सू. रा. पवार आदी पदाधिकारी यांचे मार्गदर्शनपर सहकार्य लाभले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांना खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनच्या वतीने धन्यवाद देऊन ३४व्या तालुकास्तरीय किशोर किशोरी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेची सांगता करण्यात आली.