लांजा:-जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जे. जे. स्कूल ऑफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शोध कलारत्नांचा या नाविन्यपूर्ण उपक्रमाची कार्यशाळा लांजा अल अमीन उर्दू हायस्कूल येथे उत्साहात पार पडली.
कार्यशाळेत ऑनलाईन माध्यमाद्वारे जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. तरतरे यांनी ‘शोध कलारत्नांचा’ या उपक्रमासाठी निवड झालेल्या मुलांसोबत संवाद साधला. त्यानंतर विस्तार अधिकारी शंकर रणदिवे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मुलांना प्रात्यक्षिकांसह जि. प. शाळा झापडेचे शिक्षक रामदास पांचाळ व जि. प. शाळा वनगुळेचे शिक्षक विजय कुष्टे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी शाडूच्या मातीच्या माध्यमाचा वापर करत मूर्तिकलेबद्दल माहिती दिली. जि. प. शाळा हर्दखळे येथील शिक्षक प्रकाश बंडबे यांनी रंग कामाचे प्रात्यक्षिक दिले. पेडणेकर हायस्कूलचे शिक्षक प्रकाश हर्चेकर यांनी कथा सांगून कथेतून चित्र निर्मिती बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर जि. प. शाळा कुरचुंब च्या शिक्षिका सुसीमा थोरात यांनी कथा सांगितली. त्यानंतर कथेवर आधारित विद्यार्थ्यानी रेखाटने केली. कार्यशाळेत शिल्पकाम करत विद्यार्थ्यानी नवनिर्मितीचा आनंद घेतला.
यावेळी कार्यशाळेबद्दल सहभागी विद्यार्थिनी तन्वी पवार व स्वरांगी पांचाळ यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रकाश बंडबे यांनी मानले.