मुंबई/विक्रोळी:उदय दणदणे-अखिल भारतीय मानव विकास परिषद व आदर्श मुंबई संचालित महाराष्ट्र न्यूज 18 पोर्टल न्यूज चॅनेलच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत नुकतेच महाराष्ट्रातील समाजसेवकांना “आदर्श भारतीय राजदूत ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्य संपादक डॉ. संजय भोईर व उपसंपादक भालचंद्र पाटे, नवनाथ कांबळे, पूनम पाटगावे, डॉ. श्रीपाल कांबळे, वर्षा यादव, धनश्री रेवडेकर यांच्यातर्फे सामाजिक, साहित्य, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा इ. विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या आदर्शकांचा गौरव करण्यात आला
या कार्यक्रमप्रसंगी मनोज कोटक (खासदार, ईशान्य मुंबई ), प्रा. जयवंत पाटील ( अध्यक्ष : शिक्षक साहित्य संमेलन ), सौ. सुवर्णा कारंजे (शिवसेना उपनेत्या ), प्रसिद्ध गायक संतोष चौधरी (दादूस ), राजेश गायकवाड ( राष्ट्रीय अध्यक्ष : अ. भा. जनविकास पार्टी ), समाजसेवक सुरेशदादा कोठावळे, संपादक डॉ. गणेश बढे, समाजसेवक सुरेश सरनोबत, वर्षा यादव, पूजा दळवी, विनोद मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उदघाटक मनोज कोटक (खासदार ) यांनी प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाचे महत्व सांगून आदर्श मुंबईचे संपादक डॉ. संजय भोईर व संपूर्ण टीमचे कौतुक केले.
तसेच विशेष अतिथी प्रा. जयवंत पाटील यांनी आज देशाला संविधान सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नागरिकांबरोबर पत्रकारांवर मोठी आहे, ते शिवधनुष्य पत्रकारांनी पेलावे असे मत अधोरेखित केले. तर अध्यक्ष भालचंद्र पाटे यांनी आदर्श मुंबई व महाराष्ट्र न्यूज 18 चॅनलच्या सामाजिक उपक्रमांची माहिती पाहुण्यांसाह उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमात कलावंत विबोधी यादव या अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीने सादर केलेल्या हनुमान चालीसा वंदनाने उपस्थितांसह पाहुण्यांची मने जिंकली. कार्यक्रमात डॉ. स्मिता सहस्त्रबुद्धे, बाळासाहेब अधांगळे ( राष्ट्रपती पुरस्कार विजेते ), श्रीम. मंजू सराठे, सागर नटराज यांच्यासहित कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, यवतमाळ, नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई इ. विविध ठिकाणाहून आलेल्या पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या निवेदिका कोमल झेंडे यांनी सुंदर सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पूनम पाटगावे, डॉ. श्रीपाल कांबळे, नवनाथ कांबळे, वर्षा यादव, धनश्री रेवडेकर, गौतम डांगळे, विनोद मोहिते यांनी परिश्रम घेतले.