रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गुंबद ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा मंगळवार दि. 29 ऑगस्ट रोजी पार पडली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अजीज करीम मुल्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी गुंबद ग्रामपंचायत सरपंच उषा सावंत,उपसरपंच मुनाफ वागळे, ग्रा.पंचायत सदस्य बानू खलफे, रशिदा पिलपिले, मदिना मालिम, अनिल जाधव यांच्यासह गावातील ग्रामस्थ राहुल जाधव, रहिम माद्रे, इल्याज माद्रे, दिलावर खान, हश्मत मालिम आदी उपस्थित होते. अध्यक्ष निवडीनंतर अजीज मुल्ला यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले.