जाकादेवी/वार्ताहर:-रत्नागिरी तालुक्यातील
देऊड येथे आयोजित ग्रामसभेत गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. नारायण रामचंद्र किंजळे यांची महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
गावातील सामाजिक व विधायक कामात श्री.नारायण किंजळे यांचा अग्रक्रमाने सहभाग असतो.
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेकांना सढळ मदत केली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामसभेचे अध्यक्ष श्री. संजय गंगाराम देसाई यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. नारायण रामचंद्र किंजळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मावळते अध्यक्ष श्री गोविंद सखाराम घाणेकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाविषयी समाधान व्यक्त करण्यात आले.
या निवडी प्रसंगी गावचे धडाडीचे सरपंच श्री.संजय देसाई, उपसरपंच श्री. संदीप घाणेकर, सदस्य श्री. सुनिल किंजळे, श्री. विनायक रेवाळे, सौ. अवंतिका घाणेकर, सौ. दीक्षा घाणेकर, सौ. वैभवी घाणेकर, सौ. मुग्धा देसाई, सौ. दिव्या खापले आदी सदस्य तर पोलीस पाटील श्री. संदेश घाणेकर , ग्रामविकास अधिकारी श्री. बुंदे व देवूड गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
तंटामुक्त समितीच्यावतीने गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,असा विश्वास नुतन अध्यक्ष नारायण किंजळे यांनी यावेळी व्यक्त केला.