खेड:- शहरातील नागरिकांना आगामी गणेशोत्सव सणानिमित्त आनंदाचा शिधाचे वाटप शिवसेना प्रवक्ते, आमदार मा.श्री.योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. खेड शहरातील कन्या शाळेजवळ हा कार्यक्रम शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
खेड शहरातील शिवसेनेच्या महिला आघाडीने या उपक्रमासाठी पुढाकार घेत आनंदाच्या शिधासाठी लागणारे 100/- रुपये स्वतः भरून हा आनंदाचा शिधा नागरिकांना मोफत वाटप करण्याचा उपक्रम राबविला आहे.
दरम्यान या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील नागरिकांच्या प्रती जी बांधिलकी जोपासली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले व या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख श्री. सचिन धाडवे, सतिश उर्फ पप्पू चिकणे, महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ. माधवी बुटाला, सौ. संजना कुडाळकर, सौ. संपदा गुजराथी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.