संगमेश्वर:- जर तुम्हाला रक्ताची गरज असेल आणि तुम्ही काळजीत असाल तर घाबरू नका. संगमेश्वर तालुक्यातील शिवसेनेने मोफत रक्त देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी तुम्हाला रुग्णाशी संबंधित सर्व माहिती व्हॉट्सऍप नंबरवर द्यावी लागेल, उपजिल्हा प्रमुख राजेश मुकादम,तालुका प्रमुख प्रमोद पवार,आणि तालुका संघटक प्रल्हाद गायकवाड,विभाग प्रमुख महेश देसाई यांच्या माध्यमातून संगमेश्वर संपर्क कार्यालयातून प्रत्येक गावातील ज्यास्तीत ज्यास्त ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करतील. रक्तदाते संबंधित रक्तासाठी संबंधित रुग्णांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधतील आणि रक्तदान करतील.रक्त दात्त्यांची नोंदणी संगमेश्वर संपर्क कार्यलयात होईल.ही सेवा पूर्णपणे मोफत असेल.
समाजसेवेच्या उद्देशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदान सेवा सुरू करण्यात येणार आहे.अधिकाधिक लोक या सेवेचा लाभ घेतील.रक्त न मिळाल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.अनेक प्रकरणे अशी आहेत की लोकांना आपले रक्त किंवा जीव गमवावा लागतो. त्यामुळे रक्ताचा एक थेंब कोणाला जीवदान देत असेल तर ते फार मोठे परोपकाराचे काम आहे.
सुरुवातीला 100 तरुणांची टीम तयार करून जे गरजू लोकांसाठी रक्तगटानुसार उपलब्ध करून सेवेच्या भावनेने जनहिताचे काम करण्यासाठी शिवसेनेतील कार्यकर्ते,शाखाप्रमुख,युवासेना कार्यकर्ते,शाखाप्रमुख,शिवदूत आणि बूथ प्रमुख यांनी जनकल्याणासाठी ब्लड डोनर म्हणुन नोंदणी करावी आणि या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन संगमेश्वर युवासेना उपतालुका प्रमुख सुधिर चाळके यांनी केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कवतुक करत लवकर हा उपक्रम जनतेच्या हितासाठी चालु करावा या साठी सर्व शिवसेनीकांचा आशीर्वाद असावा.
रक्त दान करूया प्रेमाची नाती जोडूया