चिपळूण/ओंकार रेळेकर:- चित्रकला हि परमेश्वराची देणगी आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी कला उपयोगी पडते. सततचा सराव व निर्मितीमुळे कलेला मूर्तरूप प्राप्त होत असून, उदयोन्मुख चित्रकारांसाठी चित्रकला स्पर्धा हे उत्तम व्यासपीठ असल्याचे महत्वपूर्ण वक्तव्य चिपळूण तालुका मुस्लिम समाज संस्थेचे कार्याध्यक्ष नझिम अफवारे यांनी केले.
पोफळी सय्यदवाडी येथील बाबा ग्रुपतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण अफवारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, स्पर्धा कोणतीही असो, या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर स्पर्धकाला आपल्या उणिवांची व आपल्या क्षमतेची जाणीव होते. त्यामुळे ज्यांच्याकडे कला, कौशल्य आहेत. अशा विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. अशा स्पर्धेतून मिळाल्या यश अपयशातून भविष्यात आयुष्याचे रंग बदलण्याची संधी स्पर्धकांना प्राप्त होत असून अशा स्पर्धा राबविणे स्तुत्य उपक्रम असल्याचे अफवारे यांनी सांगितले. त्यांनी सहभागी सर्व स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत अडीचशे हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
माझे सुंदर घर, पावसातला वातावरण, वृक्षारोपण करताना विद्यार्थी, स्वच्छता हीच माझी जबाबदारी या विषयावर विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटले होते. पहिली व दुसरीच्या गटात आएशा अशरफ सय्यद, जोया रफीक शेख यांना गौरवण्यात आले. तिसरी आणि चौथीच्या गटात गौशीया शर्फुदीन सय्यद, ईरफान हनिफ सय्यद, आफीया शमशुदीन सय्यद यांना गौरवण्यात आले. पाचवी ते सातवीच्या गटात हाजीरा नसरूद्दीन सय्यद, अलमास कादीर खान, सहीफा शरफुदीन सय्यद यांना गौरवण्यात आले. आठवी ते दहावीच्या गटात अरसलान विलायत-अल्ली सय्यद, गुलनाज इखलाक सय्यद
नाजमीन मोहम्मद सय्यद, ताबीश रियाज सय्यद यांना गौरवण्यात आले. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, कला शिक्षक बद्री कुटीमट यांचा यानिमित्त सत्कार करण्यात आला.
चिपळूण मुस्लिम समाज संस्थेचे सचिव यासीन दळवी, भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्बास सय्यद, पोफळी गावचे सरपंच उस्मान सय्यद, ग्रामपंचायत सदस्य तमन्ना सय्यद, शिरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी लालजी यादव, अल अमिन उर्दू हायस्कूल व उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक यावेळी उपस्थित होते. बाबा ग्रुपचे विलायत अली सय्यद, अजीम खान, हिदायत सय्यद, शमशुद्दीन सय्यद, इसाक सय्यद, मैनुद्दीन सय्यद, मोहसीन सय्यद, मुझफ्फर खान आदिनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.