जाकादेवी /वार्ताहर :- रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाहू महाराज जयंती निमित्त रत्नागिरी तालुका पंचायत समितीतर्फे घेण्यात आलेल्या सारथी निबंध स्पर्धेस्पर्धेमध्ये गट क्रमांक १ इयत्ता तिसरी ते पाचवी या गटातून कु. शिवानी प्रकाश गोनबरे हीचा प्रथम क्रमांक तसेच गट क्रमांक २ इयत्ता सहावी ते आठवी या गटातून कु. श्रावणी सुर्यकांत गोनबरे हीचा प्रथम क्रमांक आला आहे.
तालुकास्तरावर केंद्रातून निवडलेल्या प्रत्येकी पाच निबंधातून परीक्षण करून प्रत्येक गटातून १० निबंध निवडले गेले. त्यात गट क्रमांक १ मध्ये शिवानी हिने दुसरा क्रमांक तर गट क्रमांक २ मध्ये श्रावणी हिने दहावा क्रमांक पटकावला. दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक श्री. मनोज जाधव यांनी मुख्याध्यापक श्री. भितळे आणि सहकारी शिक्षक श्री. माने यांच्या सहकार्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती रानपाट, तसेच पालक आणि ग्रामस्थांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे खास कौतुक केले.खालगाव बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सन्मा.सौ. सशाली मोहिते यांनी मार्गदर्शक व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.