जाकादेवी/वार्ताहर:-मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे मराठी वाङ्मय विभागअंतर्गत गुरुगोविंद प्रभू जयंती निमित्ताने भित्तिपत्रकाचे अनावरण महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. स्नेहा पालये यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठी वाङ्मया अंतर्गत गुरु गोविंद प्रभू जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा परमर्ष, बालपण, सामाजिक परिवर्तन, चरित्रलीळा हे भित्तपत्रकातून मांडले. त्याचप्रमाणे आपल्या गुरुसारखे आपणही दीनदुबळ्यांची सेवा करावी, समाजातील भेदाभेदाची घाण नष्ट करुन माणसाची मने निर्मळ पाण्यासारखी बनवावी हाच संकल्प करून त्यांनी तो प्रत्यक्षात उतरविला. अस्पृश्यतेला गोविंद प्रभुंनी वाचा फोडली. विद्यार्थ्यांनी त्यांचा एखादा तरी गुण आत्मसात करावा असा संदेश दिला.
या कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. स्नेहा पालये, प्रा. कविता जाधव, प्रा. शामल करंडे, प्रा. दिपाली सावंत, प्रा. जितेंद्र बोंबले, प्रा. सुयोग मोहिरे व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.