चिपळूण- जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग रत्नागिरी,पंचायत समिती शिक्षण विभाग चिपळूण व तालुका विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान नाट्यत्सव स्पर्धेतील तालुकास्तरीय नाट्य स्पर्धा सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्व. भाऊसाहेब महाडिक सभागृहात नुकत्याच संपन्न झाल्या. या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत तालुक्यातील 10 माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. यामधून सावर्डे विद्यालयाला प्रथम क्रमांक पटकावला असून सावर्डे विद्यालयाला जिल्हास्तरावर चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेने दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञान या विषयांतर्गत गुरुत्वाकर्षण शोध, हायटेक लॉकर,रोबोट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, घड्याळाचा शोध, चांद्रयान तीन, कृषी संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग या विषयाशी अनुसरून 30 मिनिटाचे अत्यंत दिमागदार असे विज्ञान नाटक सादर केले.प्रतीक गडदे,आयुष पवार, वेद कुवळेकर,सार्थक पारधी,आदिती शेडगे,आर्या घाग, तनुश्री घाग, ध्रुविका माने या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट अभियानाद्वारे व संवादाद्वारे सर्व प्रेक्षकांची मने वेधून घेतली. या नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुल्ला सर, सोहनी मॅडम, व देडगे सर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विस्तार अधिकारी राज अहमद देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
या नाट्य स्पर्धेसाठी कविता हळदीवे, अविनाश पोतदार,श्रेया राजेशिर्के, दामिनी महाडिक, प्राजक्ता खेडेकर,वर्षा चव्हाण, सुधीर कदम, गणेश बागवे व अनंत डिके यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, शालेय समितीचे चेअरमन व संचालक शांताराम खानविलकर, सर्व संस्था पदाधिकारी,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, विद्यालयाचे प्राचर्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर,पालक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.