फुणगूस/ इकबाल पटेल:-संगमेश्वर तालुक्यातील खाडिपट्टयात मुख्यमत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्यावर विश्वास ठेवून जिल्हापरिषद गटाचे विभाग प्रमुख यांच्या प्रयत्नाने मजबुत होताना दिसत आहे.
जिल्हापरिषद गटांतर्गत येणाऱ्या विभागातील कुणबी सेना व बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष व कोंड्ये गावचे माजी सरपंच सुरेष दसम यांच्यावर शिंदे जिल्हापरिषद गट,विभागीय कार्यालय मुख्य जबाबदारी देण्यात आली आहे.कार्यरत असलेले युवक तालुका प्रमुख सुधिर चाळके यांनाही पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.डावखोळचे योगेश मुकादम व परचुरीचे दिपक लिंगायत यांना उपविभाग संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्हापरिषद गटात सहभाग होऊन जनतेचे प्रश्न सोडवून आपापल्या विभागात विकास कामे करून घेण्याचे पालक मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
खाडिभागात शिवसेना ( शिंदे गट) मजबुत होत असुन नवतरुण पक्षात प्रवेश करित आहेत. आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य तो न्याय देऊन विकास कामांसाठी खांद्याला खांदा लावून विकास कामे करू अशी प्रतिक्रिया कसबा जिल्हापरिषद गटाचे महेश देसाई यांनी व्यक्त केली आहे.