मुंबई/उदय दणदणे:-कोकणची बहुप्रिय लोककला कलगी तुरा (शक्ती-तुरा) कार्यक्रम मुंबई सारख्या शहरात व अन्य शहरातील नाट्यगृहात रसिकांच्या उदंड प्रतिसादात सादरीकरण होताना पाहायला मिळते, तर अनेक वेळा नाट्यगृह ठिकाणी ह्या लोककलेला हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेले पाहायला मिळाले, ह्या मोसमात सर्वाधिक पुरुष शाहिरांचे कार्यक्रम मुंबई रंगमंचावर रसिकांना पाहायला मिळाले असून प्रदीर्घ कालावधी नंतर महिला शक्ती-तुरा कार्यक्रमाचे ही मुबंई रंगमंचावर आयोजन होत असून गणेशोत्सव पूर्व श्रावणमासी शनिवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ रोजी ,रात्रौ-०८-३० वा. दामोदर नाट्यगृह परेल -मुबंई येथे शक्तीवाली शाहीर: संगीता पांचाळ-बलेकर शाखा: स्वर तरंग कलामंच मुबंई/रत्नागिरी आणि तुरेवाली शाहिर: प्रीती भोवड-वीर शाखा:आर्यादुर्गा नृत्य कलापथक (मुबंई) ह्या सुप्रसिद्ध शाहिरांचा हा शक्ती-तुरा जंगी सामना होणार असून ह्या कार्यक्रमाकडे तमाम कला प्रेमी रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रदीर्घ कालावधी नंतर शाहीर -संगीता पांचाळ-बलेकर, शाहीर- प्रीती भोवड-वीर ह्या महिला शाहीर आमने- सामने येत असल्याने ह्या कार्यक्रमातून बहुअर्थी रसिकांचे उत्तम मनोरंजन होण्याबरोबरच ह्या कार्यक्रमाला रसिकांची विक्रमी गर्दी होईल असा अंदाज अवघ्या कोकण कलाविश्वात बांधला जात आहे.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण गणपती स्पेशल लॉटरीचे आयोजन करण्यात आले असून त्यात गणपती मकर,पूजेचे सामान व गवर साडी असे भव्य दिव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर सदर कार्यक्रमाच्या मोजक्याच आसन व्यवस्था शिल्लक असल्याचे अधिक माहितीकरिता ८६५२६०८७०० या नंबरवर संपर्क साधावा असे आयोजक समीर बलेकर यांनी सांगितले.