कोकणातील शाहिरी कलाकार बहुसंख्येने उपस्थितीत तर १०० पेक्षा अधिक शिष्य सागरीत
मुबंई/उदय दणदणे:-कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेच्या माध्यमातून नारळी पौर्णिमेचे औचित्य साधत “ब्रिद पुजन” (सागरीत मांड) कार्यक्रम बुधवार दिनांक ३०ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४ वा. कुणबी समाजोन्नती संघ,वाघे हॉल परळ मुंबई-१२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सन-१९७० पासून प्रतिवर्षी साजरा होत असलेल्या या कार्यक्रमात जेष्ठ-नवोदित शाहिरी कलाकार मोठ्या उत्साहात सहभागी होत गुरू-शिष्यांचा संवाद या निमित्ताने घडत असतो. गुरू परंपरा लाभलेल्या ह्या कार्यक्रमा प्रसंगी शाहीर डॉ.सुर्यकांत चव्हाण,वस्ताद पांडुरंग देवळेकर,वस्ताद मधुकर पंदेरे, वस्ताद सुरेश चिबडे, वस्ताद सुरेश ऐनारकर, शाहीर तुषार पंदेरे, शाहीर निलेश जोगळे, वस्ताद चंद्रकांत धोपट, वस्ताद प्रकाश गोसावी अशा गुरूवर्य, वस्ताद शाहीरांनी “डफावर शाहीरी” सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
कलगी तुराच्या प्रवाहातील अनेक शाहिरांनी ब्रिदावर येऊन दर्शन घेतले त्यापैकी शाहीर प्रकाश पांजणे, शाहीर तुषार पंदेरे, शाहीर सचिन कदम, शाहीर सचिन धूमक, शाहीर संदेश दूदम, शाहीर कीशोर सनस, शाहीर सदानंद सरवंदे, शाहीर भिकाजी भुवड, शाहीर संतोष पारदले, शाहीर योगेश कातकर, शाहीर रतन मोरे, मंगेश यादव,अमर फटकरे, शाहीर किशोर धनावडे, शाहीर अमोल दैत, शाहीर राजू धाडवे,शाहीर राजेश निकम,भरत गाणेकर, प्रमोद घुमे आणि पत्रकार उदय दणदणे अश्या सर्व शाहीरी वर्ग व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यातआला. त्याचबरोबर मंडळाचे जुने जाणते सदस्य वस्ताद अनिल सावंत,गुरूवर्य डॉ.सूर्यकांत चव्हाण,वस्ताद मधूकर पंदेरे, शाहीर सखाराम माळी,शाहीर कृष्णा जोगळे,वस्ताद संजय गोणबरे अशा अनेक वरिष्ठ शाहीरांनी सदर कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्या बद्दल त्यांचे मातृसंस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
तर ब्रीद पुजना चे औचित्य साधून मुळ कवी भानुदास घराणे, गुरू गणपती घराणे,बाबू रंगेले घराणे,शंभू राजू घराणे,अशा अनेक घरांण्यातील शिष्यांना शाहीर, वस्ताद म्हणून कलगी तुरा ब्रिद पुजन मांडावर सागरीत करण्यात आले त्यात एकूण २ वस्ताद तर १०० पेक्षा अधिक शिष्य सागरीत झाल्याची माहिती सचीव संतोष धारशे यांनी दिली.
सदर कार्यक्रमात चिठ्ठी मालक, वस्ताद, शाहीर वर्ग कलाकार मंडळी, हितचिंत उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला त्या सर्वांचे कलगी तुरा समाज उन्नती मंडळ-मुबंई कार्यकारणी वतीने आभार मानण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अनंत तांबे,उपाध्यक्ष सुरेश ऐनारकर, सुरेश चिबडे, सरचिटणीस संतोष धारशे,चिटणीस सुधाकर मास्कर, खजिनदार सत्यवान यादव, सदस्य अनंत मुंगळे,सुरेश कदम
निलेश जोगळे,दिपक महादे,वादविवाद समिती उपाध्यक्ष चंद्रकांत धोपट,दामोदर गोरिवले,दिलीप नामे,उदय चिबडे यांनी विशेष परिश्रम घेतले.