देवरुख:-शालेय क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी व जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. डॉ. सुलभा आपटे क्रीडा संकुल, देवरुख येथे संपन्न झाल्या. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी संगमेश्वर तालुका शालेय क्रीडा समन्वयक अभिजीत कदम,राज्यस्तरीय पंच सोहम प्रभूदेसाई, क्रीडा शिक्षक तानाजी कदम, अक्षय कांबळे, प्रसाद शिंदे आणि विविध शाळेतील क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक व खेळाडू यांची उपस्थिती होती.
संगमेश्वर तालुका संघातून विजयी झालेले स्पर्धक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय पंच
सोहम प्रभूदेसाई आणि क्रीडा शिक्षक प्रा. सागर पवार यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. स्पर्धेतील विविध गटातील यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे:
१४ वर्षाखालील मुले- तन्मय डोंगरे, दर्श धनावडे, यशराज कटके, वेदांत मायंगडे, स्मित जागुष्टे.
१४ वर्षाखालील मुली- आयुषी कुर्लिकर, तीर्था पंदेरे, मधुरा पांचाळ, श्लोका संकपाळ, आर्या यशवंतराव.
१७ वर्षाखालील मुले-
पार्थ तांदळे, आर्श मेस्त्री, ध्रुव भागवत, अनिश जागुष्टे, ओंकार गिड्ये.
१७ वर्षाखालील मुली-
मृगजा जुवेकर, जिज्ञासा कनावजे, श्रिया अणेराव, तेजस्विनीकुमारी चुंडावंत.
संगमेश्वर तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेमधील १७ वर्षाखालील मुले गटात द्वितीय स्थानावर कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूल, साखरपा तर तृतीय स्थानावर महात्मा गांधी विद्यालय, साखरपा यांनी तर १७ वर्षाखालील मुली गटात महात्मा गांधी विद्यालय, साखरपा यांनी उपविजेतेपद प्राप्त केले. सर्व यशस्वी व सहभागी स्पर्धकांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, राजेंद्र राजवाडे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, मुख्याध्यापक मधुकर कोकणी, सोनाली नारकर व दीक्षा खंडागळे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.