गुहागर/उदय दणदणे:-गुहागर तालुका औद्योगिक बहूउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित (गुहागर) ह्या संस्थेची-२०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक-१५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वा. शृंगारतळी येथील कार्यालयात आयोजित करण्यात आले असून संस्थेचे संचालक,अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या वतीने सर्व सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सदर वार्षिक सभा गणपूर्ती अभावी तहकूब झाल्यास त्याच दिवशी एका तासानंतर त्याच ठिकाणी सदर सभा होईल.
त्याला गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही असे उपरोक्त संस्थेचे शासकीय सचिव अमित नंदकुमार इंदुलकर यांनी सांगितले. सदर वार्षिक सभा संपल्यानंतर दुपारी १२ वा. संस्थेच्या शृंगारतळी येथील कार्यालयात गुहागर तालुक्यातील जास्तीत जास्त महिला उद्योजिका बनण्यासाठी “गुहागर तालुका औद्योगिक बहूउद्देशीय सहकारी संस्था” व निशाज व्होकेशनल ट्रेनिंग दापोलीच्या संस्थापक/संचालिका- निशा चंद्रकांत सावंत मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
निशा सावंत यांनी आजवर ५०० हुन अधिक महिलांना उद्योजिका बनण्यासाठी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले आहे.सदर मार्गदर्शन शिबिरातून उद्योजिका बनण्यासाठी इच्छुक महिलांना संस्थेच्या वतीने उद्योग सुरु करण्यासाठी व पुढील प्रशिक्षणासाठी मदत तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मदतींचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.त्याचबरोबर संस्थेच्या कार्यालयामध्ये पुढील काळात महिलांना व्यवसाय करण्यासाठी काही अटी व नियमांच्या शर्तीवर संस्थेचे कार्यालय उपलब्ध करुन देण्याचा संचालकांचा मानस असुन सदर मार्गदर्शन शिबिराला तालुक्यातील सर्व स्थरामधील महिला व कॉलेज करून उत्पनाचे साधन मिळवू इच्छिणाऱ्या मुलींनी सदर मार्गदर्शन शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने सर्व संचालक व अध्यक्ष ॲड.सुशील अवेरे यांनी केले आहे.