संगमेश्वर/इकबाल पटेल:- नावडी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त अध्यक्षपदी सामजिक कार्यकर्ते संतोष सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीची ग्रामसभा १५ ऑगस्ट रोजी तहकूब करण्यात आली होती.तीच तहकूब ग्रामसभा आज पार पडली.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष निवड प्रक्रिया झाली.यामध्ये सर्वानुमते संतोष सुर्वे यांची बिनविरोध निवड ग्रामस्थांनी केली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील नावडी ग्रामपंचायत ही मिनी महानगर समजली जाते.
यावेळी सरपंच सौ.प्रज्ञा कोळवणकर,उपसरपंच विवेक शेरे,ग्रामसेवक संजय शेलार,सदस्य संजय कदम,अभिजित चोचे,गणेश पवार,याकूब पठाण,सौ.डोंगरे,सौ.शेरे,सौ.झोरे,सौ.चव्हाण, सौ.आंब्रे, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री.सुर्वे यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड होताच ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.