खेड, संगलट/इकबाल जमादार:-दापोली तालुक्यातील जि.प. शाळा सडवे नं.१ शाळेत कोळबांद्रे केंद्राची तिसरी शैक्षणिक परिषद संजय जंगम यांचे अध्यक्षतेत उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी शाळेतील मुलांनी प्रबोधनात्मक,राष्ट्रभक्तीपर सुस्वर अशा गीत गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तद्नंतर मुलांनीच तयार केलेले आकर्षक पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करणेत आले.प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन मुख्याध्यापक शामराव वरेकर यांनी केले,तर
गुणवत्ता टिकवणे आणि वाढवणे यासाठी आपण समरस होणे हेच आपले कार्य असल्याने, आपण दक्ष राहून आपले शैक्षणिक उद्दिष्ट यशस्वी करुया,असे अध्यक्षीय भाषणात संजय जंगम यांनी सांगितले. प्रमुख अतिथी प्रभाग विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी,
निकषानुसार नाविन्यपूर्ण विषय परिषदेत हाताळले जातात.
परिस्थिती आणि गुणवत्ता यांची सांगड घालून यश खेचून आणता येईल.
ध्येय उच्च सेल तर यश हमखास मिळते. असे सांगत वर्षानुवर्षे शाळांमध्ये अडगळीत असलेल्या निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन करुन शाळा स्वच्छ करुन घ्यावी तसेच मिशन आपुलकी यशस्वीपणे राबवा अशा विविध सुचना देत मार्गदर्शन केले. तर केंद्रीयप्रमुख संजय मेहता यांनी बालसभा,ग्रामसभा,यासह, नवसाक्षर भारत सर्वेक्षण तसेच प्रशासकिय माहिती विषयी सखोल मार्गदर्शन केले.
यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा २०२०विषयी सत्यप्रेम घुगे यांनी तर P.E.T.अंतर्गत चाचणी या विषयी विलास सकपाळ यांनी मार्गदर्शन केले. तद्नंतर शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे याबद्दल प्रात्यक्षिक दाखवत मनोहर सनवारे यांनी सर्वांना प्रेरणा दिली आणि शैक्षणिक सेवा सुविधांबाबत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणार्या विविध सेवांबद्दल माहिती सुरेश पाटील यांनी दिली. शेवटी सडवे शाळेचे मुख्याध्यापक शामराव वरेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
परिषद यशस्वीतेसाठी नेहा उकसकर,
निकीता मेंगे,श्री.जगताप शाळेतील विद्यार्थी यांचेसह शाळा व्यवस्थापन समिती मधील सदस्या सारिका शिगवण,जान्हवी झीमणे,संजना वाडकर, श्रीम.काताळकर आदिंनी प्रयत्न केले.