पदाधिकाऱ्यांचा सभेत निर्धार
दापोली:- पालगड जि. प. गटाची (पालगड पंचायत समिती व कुडावळे गण) संयुक्त सभा दापोली विधानसभा संपर्कप्रमुख प्रवीण लाड यांच्या नेतृत्वाखाली आणि दापोली विधानसभा पालगड विभागप्रमुख विश्वनाथ (बबनराव) मोरे व सल्लागार दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
2024 च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा डौलाने फडकवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या सभेला माजी आमदार संजय कदम यांच्यासह विधानसभा संपर्कप्रमुख रूपेश बेलोसे, दापोली मुंबई कार्यकारिणी संघटक विजय ठोंबरे, सचिव सुहास खोकरे, उपसंघटक रवी धाडवे, सहसचिव अजित शिर्के, विलास जाधव, पुरुषोत्तम घाग, प्रमोद कदम यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.सभेचे आयोजन पालगड गटाचे समन्वयक राकेश खेडेकर, पालगड गण विभागप्रमुख पुरुषोत्तम घाग व कुडावळे गण प्रमोद कदम यांनी केले होते