खेड,संगलट/इक्बाल जमादार:-खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ , खेड संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) या प्रशालेमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे, सभाधीटपणा वाढवणारे, संस्कृती परंपरा जोपासणारे विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जातात.
त्याचप्रमाणे संस्कृत विषयाची गोडी वाढावी म्हणून शाळा स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याचाच भाग म्हणून प्रशालेत दि . 30 ऑगस्ट २०२३ रोजी संस्कृत कवी कालिदास यांच्या जयंती निमित्त संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल CBSE चे संस्कृत विषयाचे शिक्षक करन दिगंबरे उपस्थित होते.
संस्कृत दिनानिमित्त इ. 8 वी ते १0 वी पर्यंतच्या १३७ विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा, संख्या पठणम, कथाकथन, निबंध, सुभाषिते इत्यादि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रशालेचे मुख्याध्यापक व संस्कृत विषयाचे शिक्षक राजकुमार मगदूम, मकरंद दाबके यांनी मेहनत घेतली.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढढा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.