माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांची उपस्थिती
चिपळूण:- तालुक्यातील उर्दू शाळा आणि मापारी मोहल्ला उर्दू शाळा येथे रत्नागिरी जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष विक्रांतजी जाधव यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
चिपळूण शहरातील चिपळूण उर्दू शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी जोया अबरार शाह , उप. शिक्षिका राहीन नेवरेकर आणि रिझवाना मुल्लाजी यांनी स्वागत केले. फैसल कास्कर यांनी रक्षाबंधना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. शाळेतील दोन्ही शिक्षिकांनी मान्यवरांना तसेच शाळेतील विद्यार्थिनींनी सर्वांना राख्या बांधल्या.
त्या नंतर विक्रांतजी जाधव यांचे मापारी मोहल्ला उर्दू शाळेत आगमन झाले. शाळेचे मुख्याध्यापक निसारअहमद तांबे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानीय माजी जि. प. अध्यक्ष आणि शाळेत आलेल्या समाजसेवकांचे तसेच मान्यवरांचे दिलखुलास स्वागत केले. शाळेचे उप. शिक्षक एजाज इब्जी यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्म समभाव या विषयी उत्तम माहिती दिली.
शाळेच्या पदवीधर शिक्षिका समीनाकौसर शेख यांनी माजी जि. प. अध्यक्षांना राखी बांधून आपल्या भावाचे उज्ज्वल भविष्य आणि भरभराटी साठी प्रार्थना केली. सामाजिक कार्यकर्त्या यांनी तांबे सर, इब्जी सर यांना राख्या बांधून आशिर्वाद घेतले. दोन्ही शाळेत विद्यार्थ्यांना मिठाई, चॉकलेट वाटून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. दोन्ही शाळेच्या वतीने चिपळूण उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शौकत कारविणकर यांनी मन:पूर्वक आभार मानले.