कडवई:रत्नागिरी क्रीडा परिषद यांच्या वतीने देवरुख येथे आयोजित 19- वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या व्व्हॉलीबॉल स्पर्धेत आज महाराष्ट्र ऊर्दू हायस्कूल कडवई शाळेने संगमेश्वर तालुक्यात विजेतेपद पटकावले. प्रशालेचे विद्यार्थी कु.अदनान शाह(संघ कर्णधार),राझीन जांभारकर,रेहान खान,अमान गुहागरकर,माहीर सोलकर,अफीफ मुकादम,फिझियान बारगीर,दानियाल सोलकर या सर्वांनी व्हाॅलीबॉल खेळात उत्कृष्ठ क्रीडा कौशल्य वापरुन तालुकास्तरीय स्पर्धा जिंकून जिल्हास्तरावर धडक मारली. विजेता संघाला प्रशालेचे मुख्याध्यापक रिझवान कारिगर आणि क्रीडा शिक्षक जावेद दखनी सरांनी मार्गदर्शन केले.जमातुल मुस्लिमीन कडवई,एज्युकेशन सोसायटी कडवई अध्यक्ष सादीक काजी व सहकारी,मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पत्रकार मुजीब खान यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई विजेता
