तुलसी खापरे व समीक्षा जसवालची चमकदार कामगिरी
चिपळूण – शैक्षणिक वर्ष 2023- 24 च्या चिपळूण तालुका स्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा नुकत्याच भव्य एस. व्ही.जे.सि.टी डेरवण येथे संपन्न झाल्या. या तालुका स्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे चा 17 वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ सहभागी झाला होता. या चुरशीच्या स्पर्धेत चिपळूण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेला प्राप्त झाली आहे.
अतिशय अतितटीच्या अंतिम सामन्यामध्ये गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूण या विद्यालयाला 2-0 अशा फरकाने हरवून एकतर्फी विजय मिळवला.या विजयामधे पहिला गोल तुलसी खापरे हिने नोंदवत चांगली सुरवात केली व लगेच दुसरा गोल समिक्षा जसवाल हिने केला. सोबत अंजली गुरव, अक्षया होडे, अवंती नरळकर, आरती मकाळे, जागृती ओकटे, प्रचिती भारती, प्रिया पवार, वेदिका मोरे, समृध्दी पाष्टे, सलोनी बागवे, सायली शिंदे, स्वरूप कुसळकर, अमृता पिरधनकर, पायल चव्हाण या खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळाने विजयश्री खेचून आणली. सर्व खेळाडूना क्रीडा शिक्षक रोहित गमरे व अमृत कडगावे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळांडूच्या यशाबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेखरजी निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर सर्व संस्था पदाधिकारी व संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रकुमार वारे, उपप्राचार्य विजय काटे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी अभिनंदन केले आहे. या भरघोष यशाबद्दल सावर्डे पंचक्रोशीतून सर्व यशस्वी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.