रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सभा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात उत्साहात झाली. पतसंस्थेच्या अध्यक्ष युगंधरा राजेशिर्के यांच्यासह संचालिकांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सभेला सुरवात झाली.
गतवर्षात दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपाध्यक्षा सुजाता तांबे, संचालिका स्वप्ना सावंत, आसावरी शेट्ये, सरिता बोरकर, स्वीकृत सदस्या प्राची शिंदे, माजी संचालिका ज्योत्स्ना कदम आदी उपस्थित होत्या.
संचालिका सरिता बोरकर यांनी अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. संचालिका स्वप्ना सावंत यांनी प्रास्ताविक आणि संस्थेचा अहवाल सादर केला. त्यानंतर संस्थेच्या आरडी, पिग्मी एजंट यांच्या दहावी, बारावीतील गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. संचालिका आसावरी शेट्ये यांना राज्य शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पतसंस्थेच्या वतीने सत्कार केला. सदस्य सौ. शुभदा भाटकर यांनी महिला पतसंस्थेमुळे आमच्या बऱ्याच आर्थिक समस्या सोडवू शकलो, तसेच येथील कर्मचारी खूप सहकार्य करतात, असे मनोगतात सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात युगंधरा राजेशिर्के यांनी गेल्या ३२ वर्षांत संस्थेची वाटचाल कशा प्रकारे होत गेली, याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले, स्पर्धेच्या युगात महिलांसाठी पत निर्माण करण्याचे काम संस्थेने केले आहे. यापुढेही महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. कर्जदार महिलांनी आपले कर्ज वेळेत फेडून संस्थेला सहकार्य करावे.
या सभेला व माजी उपाध्यक्ष सुचित्रा गांधी यासुद्धा उपस्थित होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कृतिका सुवरे यांनी कार्य अहवाल सादर केला. व्यवस्थापिका आदिती पेजे यांनी गेल्या वर्षीच्या अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन संचालिका प्राची शिंदे यांनी केले. या वेळी उपाध्यक्ष सुजाता तांबे यांनी आभार मानले.