दापोली:-एसटीच्या दापोली आगाराकडून शनिशिंगणापूर-शिर्डी दर्शन विशेष फेरी सोडण्यात येणार आहे. ही फेरी दापोलीतून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता सुटणार आहे.
पहिल्या दिवशी दापोलीतून मार्गस्थ झाल्यानंतर प्रथम शनिशिंगणापूर येथे दर्शन घेतल्यानंतर शिर्डी येथे मुक्काम होईल.
दुसर्या दिवशी रांजणगाव महागणपती, थेऊर येथून गाडी दापोलीकडे रवाना होईल.
या फेरीचा तिकीट दर प्रौढांना १५०० रुपये, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना ७५० रुपये असा राहील. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनादेखील लागू राहणार आहे. प्रवासी उपलब्धतेनुसार बस सोडण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सौ. मधाळे(७३५०५१५५४४), श्री. नाफाडे (९८९०४३८८७७) किंवा मुनाफ राजापकर (९४२२३८२८००) यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दापोली एसटी आगाराकडून करण्यात आले आहे.