संगमेश्वर:- डिंगणी येथील तीन वाड्यांच्या स्मशान भूमीची शेड पूर्णपणे जीर्ण झाली होती. या स्मशान भूमीची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली होती.
हि बाब कळताच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या आशीर्वादाने, उपजिल्हा प्रमुख राजेश मुकादम, तालुका प्रमुख प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना उपतालुकाप्रमुख सुधीर चाळके यांच्या पुढाकाराने आणि डिंगणी सरपंच समीरा खान,शाखा प्रमुख विशाल कदम,तंटामुक्त अध्यक्ष भगवान खाडे,गावकर वामन काष्टे,योगेश खाडे,सचिन राऊत यांच्या श्रमदानातून स्मशान शेडचे काम करण्यात आले.
या वेळी ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या ब्रीद वाक्याप्रमाणे शिवसेना खाडी पट्ट्यात काम करत आहे.आम्ही राजकारण करत नसून सामाजिक बांधिलकी जपत आहोत.असे युवा सेना उपतालुकाप्रमुख सुधीर चाळके यांनी सांगितले.
युवा सेनेने केल्या कामाचे ग्रामस्थांनी कौतुक करून आभार मानले आहेत.