रत्नागिरी:- महिला व बालविकास मंत्री आदिती सुनिल तटकरे या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार २६ ऑगस्ट रोजी सकाळ ८.३० वाजता सुतारवाडी, ता. रोहा येथून शासकीय वाहनाने सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी ११.१५ वाजता सावर्डे येथे आगमन व स्वर्गीय गोविंदरावजी निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथे राखीव.
सकाळी ११.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती.
(स्थळ :स्वर्गीय गोविंदरावजी निकम कॉलेज ऑफ फार्मसी हॉल, सावर्डे) दुपारी १.३० ते २ वाजता राखीव.
(सह्याद्री पॉलिटेक्निक कॉलेज, सावर्डे) दुपारी २ वाजता महिला व बाल विकास विभाग, रत्नागिरी आयोजित महिला बचत गट, अंगणवाडी कर्मचारी मेळावा, बचत गट धनादेश वाटप, माझी कन्या भाग्यश्री प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम.(स्थळ : सह्याद्री पॉलिटेक्निक कॉलेज हॉल, सावर्डे) दुपारी ३.४५ वाजता डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते येथे आमदार शेखर निकम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या मृद संधारण बंधाऱ्याचे जल पूजन कार्यक्रमास उपस्थिती.
सायंकाळी ४.३० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे येथे अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका आरोग्य तपासणी शिबिरास भेट. सायंकाळी ५.३० वाजता चिपळूण येथे Working Women Hostel ला भेट व अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. सोईनुसार चिपळूण येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी, ता. रोहाकडे प्रयाण.