गुहागर/ उदय दणदणे:-गुहागर तालुक्यातील पालशेत-निवोशी ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवोशी गावचे सुपुत्र अर्जुन गोविंद अवेरे यांची निवड झाली असून दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते मते ही निवड करण्यात आली. अर्जुन अवेरे हे गेली अनेक वर्ष पालशेत-निवोशी ग्रामपंचायतीच्या विविध समितीवर कार्यरत आहेत.
पाच वर्षे त्यांनी सदस्य पद ही भूषविले आहे.तर दहा वर्षापेक्षा अधीक काळ त्यांनी ग्राम शिक्षण समितीचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे.त्याचबरोबर ग्रामदैवत जाखमाता देवी ट्रस्टचे ते जवळ जवळ पंधरा वर्षे अध्यक्ष पदी कार्यरत होते. निवोशी नानेवाडीच्या सचिव पदी ते सद्या कार्यरत असून त्यांनी आजवर विविध ठिकाणी भूषविलेल्या पद सेवेतून समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
तर ग्रामपंचायत प्रक्रियेतून निवोशी गावच्या इतिहासात प्रमुख पदावर तसेच तंटामुक्ती अध्यक्ष पदी विराजमान होण्याचा पहिला बहुमान अर्जुन अवेरे यांनी प्राप्त केला असुन,पालशेत-निवोशी ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष पदी अर्जुन अवेरे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन सह पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.