मुंबई : गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी मोठा सण असतो. त्यामुळे कित्येक चाकरमानी कोकणात जातात. गणेशोत्सवासाठी गावी जायचेच असा निर्धार करून हजारो चाकरमानी 3 महिनेआधीच जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात.
त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेची कन्फर्म तिकीट मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यावर्षी दीड लाख चाकरमानी कोकणात जाणार आहेत.
रेल्वेकडून गणेशोत्सव काळात 94 अनारक्षित गाड्या चालवल्या जाणार आहेत. जवळपास दीड लाख चाकरमानी यंदा कोकणात पोहोचणार आहेत. आतापर्यंत तब्बल १ लाख ४ हजार चाकरमान्यांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळाल्याची माहिती आहे. अनारक्षित ९४ गाडय़ांच्या माध्यमातून दीड लाख प्रवासी कोकणात पोहोचणार आहेत. यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत आपल्या कुटुंबकबियांसह कोकणात जाण्यासाठी तयारीला सुरवात केली आहे.