माजी सैनिकांची विशेष उपस्थिती
चिपळूण:-सहयाद्रि शिक्षण संस्थेची ISO 9001:2015 मानांकन प्राप्त सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) ता.चिपळूण हे एक उपक्रमशील विद्यालय आहे. भारतीय जवान प्राण पणाला लावून देशाची सेवा करीत आहेत. सर्वच जवानांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची राखी बांधण्यासाठी येता येत नाही.
देशसेवेविषयीची भावना वाढीस लागावी, या विचाराने विद्यालयाच्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थिनींना एकत्र करून १००० आकर्षक राख्या तयार केल्या व सोबत एक संदेश पत्र असे स्वतंत्र पाकिटात भरून भारतीय सीमेवरील जवानांना पाठविण्यासाठी माजी सैनिक सुभेदार श्री. प्रदिपराव चाळके साहेब, नाईक श्री. प्रवीण भुरण साहेब, शिपाई श्री. दिपक राजवीर साहेब यांच्या शुभहस्ते भारतीय जवानांना राख्या पाठवण्यात आल्या. कार्यक्रमावेळी सदर माजी सैनिक वर्दीमध्ये आले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेविषयी अधिक प्रबळ इच्छा निर्माण झाली.
यावेळी भारत माता की जय…वंदे मातरम् अशा घोषणांनी सभागृह दणाणून निघाले. कार्यक्रामासाठी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. अनिल शिंदे, सदस्या सौ.ऋचिता निर्मळ, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. स्वरा कदम, सदस्या सौ. स्नेहल मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. विनया नटे यांनी केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ, शिक्षिका सौ. मनिषा कांबळी, सौ.रश्मी राजेशिर्के, श्री. संदेश सावंत, सौ. अपूर्वा शिंदे, सौ. विनया नटे, श्रीम. वृषाली राणे, श्रीम. अर्चना देशमुख, सौ. रूपाली खरात, श्रीम. ज्योती चाळके, श्रीम. वर्षा सकपाळ, सौ. शितल पाटील, सौ. माधुरी खताळ, सौ. स्वरा भुरण यांनी विशेष मेहनत घेतली.