संगमेश्वर:-भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुका महिला मोर्चा आयोजित मंगळागौर स्पर्धा रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी देवरुख येथील नृसिंह मंगल कार्यालय येथे संपन्न झाल्या.
यामध्ये जिल्ह्यातून एकूण बारा गट सहभागी होते. मंगळागौरीतील वेगवेगळे खेळ फुगडी, बस फुगडी, आगोटा पागोटा, सुप, लाटण्या, गोफ, घागर इत्यादी पारंपारिक खेळाचा अविष्कार बघायला मिळाला. त्यामध्ये संगमेश्वर नावडी ग्रुप मधून आठ महिला सहभागी झाल्या होत्या. ताल,लय आणि नृत्य सादरीकरण या विभागामधून संगमेश्वर नावडी ग्रुप मधील सौ.अर्चिता कोकाटे (शेट्ये )यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस संगमेश्वर तालुका अध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रत्येक गटातून एका महिलेला उठावदार व्यक्तिमत्व म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये संगमेश्वर नावडी गटातील सौ.सविता हळदकर यांना महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. कोमल रहाटे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या गटात सौ.प्रिया सावंत सौ. नयनाताई शेट्ये सौ. दीप्ती मुरकर सौ सुप्रिया कदम सौ आर्या मयेकर सौ शिल्पा सुर्वे या महिला सहभागी होत्या.
सौ. अर्चिता कोकाटे या पैसा फंड इंग्लिश स्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम संगमेश्वर मध्ये राबवण्यामध्ये त्यांचा विशेष सहभाग असतो. महिलांच्या सक्षमीकरणांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. महिलांना पुढे नेण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड चालू असते.
सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 2023 -24 त्यांना 31 मे रोजी मिळाला. त्यांचे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या सर्व महिलांचे संगमेश्वर नावडी मधून कौतुक होत आहे त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन.
बक्षीस समारंभाच्या वेळी माननीय संगमेश्वर तालुका अध्यक्ष श्री प्रमोद अधटराव,संगमेश्वर महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ.कोमल रहाटे, सरचिटणीस सौ.झगडे मॅडम,भाजपच्या महिला जिल्हा पदाधिकारी सौ. ताम्हणकर मॅडम व सौ जट्यार मॅडम उपस्थित होत्या. बक्षीस पात्र महिलांना भेटवस्तू, प्रमाणपत्रआणि सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले.