कडवई:संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे पार पडलेल्या नांगरणी स्पर्धेत अमित साळुंके यांच्या भैरी भवानी,चिखली संघाने प्रथम क्रमांक पटकावला.युवा मंच, कडवईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गावठी बैल नांगरणी स्पर्धेत जिल्ह्यातील ५१ बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेचे उद्घाटन शशिकांत जोशी यांच्या हस्ते पार पडले.स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील हजारो लोक उपस्थित होते.
या स्पर्धेत भैरी भवानी संघाच्या अमित साळुंके यांच्या बैल गाडीने प्रथम क्रमांक प्राप्त केला.जॅकी म्हणून साईराज महाडिकने काम केले.द्वितीय क्रमांक तुरळच्या मन्या देसाई यांनी,तृतीय क्रमांक कडवईच्या जयदेव धामणाक यांनी ,चतुर्थ क्रमांक तुरळच्या सुरेश हरेकर यांनी,पाचवा क्रमांक गोळवलीच्या जयराम किंजळकर यांनी प्राप्त केला.शिंदे आंबेरीचे मारुती शिंदे व गोळवलीचे निलेश भुवड यांच्या बैल जोडीला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. प्रथम क्रमांकाला रोख रक्कम ५०००/- रु. व ढाल, द्वितीय ४०००/- व ढाल, तृतीय ३०००/- व ढाल, चतुर्थ २०००/ व ढाल, पाचवा १०००/- व ढाल तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त करणाऱ्या बैलजोडीला ढाल अशी बक्षीसे दिली देण्यात आली.
या कार्यक्रमाला माजी तंटामुक्ती अध्यक्ष अनंत उजगावकर,माजी सरपंच धोंडू किंजळकर,शशिकांत मोहिते,तंटामुक्ती अध्यक्ष मुझफ्फर अली खान आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेचे सूत्रसंचालन सुनिल शिगवण यांनी केले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कमेटी मेंबर सुशिल जोशी,दिप्तेश जोशी,ओंकार जोशी ,साहिलभुवड ,आदित्य बडद, राहुल चाचुकडे, राज नवेले , संकेत पवार, संकेत नवेले ,आशिष नवेले यांनी मेहनत घेतली.