मंडणगड:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंडणगड येथे दिवाणी न्यायालयाला मंजुरी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड हा तालुका रायगड लोकसभा मतदारसंघात येतो आणि विधानसभेला तो दापोलीला जोडण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
दापोलीमध्ये शिवसेनेचे योगेश कदम आमदार आहेत, तर रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनील तटकरे करतात. त्यामुळे युती सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याबरोबरच शिवसेनेच्या योगेश कदम यांच्या मदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.