मुबंई / उदय दणदणे:-कोकणचा एक कणही वाया जात नाही अशा कोकणातील कलगी-तुरा व नमन ह्या लोककला कोकणचं खर वैभव व कोकणकला संस्कृतीचा खरा दागिना होय.अनेक गाव-वाडी कुशीत या लोककला जोपासण्या बरोबरच तिच्या सादरीकरणातून प्राप्त उत्पन्नातून गाव-वाडी विकासावर भर दिला जातो,कोकणातील समाजव्यवस्थेत या लोककलांना फार महत्व प्राप्त आहे.
सण ,उत्सव,महोत्सव अशा विविध उपक्रमातून ह्या लोककला जोपासण्याचे कार्य कोकणातील अनेक गाव मंडळे, आयोजक करत आहेत.असाच एक उपक्रम “श्री गणेश कृपा सेवा मंडळ ” सोनगिरी (तेलीवाडी) ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी या मंडळाने हाती घेतला असून येथील ग्रामस्थांचं, अनेक भाविकांच श्रद्धास्थान असलेले “श्री गणेश मंदिर” जीर्णोद्धार निधी संकलन करीता उपरोक्त मंडळाच्या वतीने शुक्रवार दिनांक १८ऑगस्ट २०२३ रोजी रात्रौ ०८:३० वा. मा.दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले-मुबंई येथे कोकणची बहुप्रिय लोककला (जाखडी नृत्य) शक्ती-तुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शक्तीवाले शाहीर:प्रदीप धाडवे शाखा- जय हनुमान नाच मंडळ (खेड-रत्नागिरी) आण