गुहागर/उदय दणदणे:-कोकणातील कला,शैक्षणिक, सामजिक राजकीय पटलावर अग्रेसर असणारं गुहागर तालुक्यातील सेवाभावी नेतृत्व, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष तथा उद्योजक प्रमोद गांधी (मुंढर) यांच्या वतीने शुक्रवार दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी जि.प.शाळा मुंढर नं.१ येथील ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी स्कुल बॅग,कंपास,बॉक्स,कलर बॉक्स,चित्रकला वही, लेजर बुक व छत्री इत्यादी शैक्षणिक साहित्याचे त्यात समावेश होता.
प्रसंगी मुंढर गावचे सरपंच प्रदीप अवेरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश आग्रे, मुख्याध्यापिका धनश्री पेठकर,पोलीस पाटील निलेश गमरे, सुरेश गांधी,रमेश गांधी, ग्रामसेवक सुरेश गोरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शमिका शिर्के, मानसी शिर्के, प्रमोद शिर्के,सचिन चाळके,उपशिक्षिका रेश्मा राऊत, सेजल शिर्के इत्यादी उपस्थित होते,शाळेचे पदवीधर शिक्षक दशरथ कदम यांनी सुचविल्याप्रमाणे व मुलांची गरज लक्षात घेऊन आपण हे शैक्षणिक साहित्य मुलांना वितरीत करीत असल्याचे उद्योजक प्रमोद गांधी यांनी सांगितले.आपण नेहमीच शिक्षण विषयक गरजांचा विचार करून त्या पूर्तता करण्याचा प्रयत्न करू व त्याचा जास्तीत जास्त फायदा मुलांनी करून घ्यावा असे ते साहित्य वाटप कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.सदर साहित्य वाटपाच्या प्रसंगी मनसे उप जिल्हा अध्यक्ष विनोद जानवलकर मनसे गुहागर तालुका अध्यक्ष सुरेश हळदणकर, पत्रकार गणेश किर्वे,नितीन कारकर,व गुहागर मनसेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.