कडवई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने भाईशा घोसाळकर हायस्कूमध्ये देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.वक्तृत्व स्पर्धेत सिध्दी उजगावकर प्रथम,अर्णवी कानाल द्वितीय, मणिका पवार तृतीय,तर स्वराज चव्हाण याने चतुर्थ क्रमांक पटकावला.या स्पर्धेचे परीक्षण आशिष सरमोकादम सर,सिध्दी सुर्वे मॅडम,सूरज कदम सर, दादाराव साबणे सर यांनी केले.
गीत गायन स्पर्धेत नववी – ब प्रथम,सहावी – ब द्वितीय,आठवी – अने तृतीय क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेचे परीक्षण समीर भालेकर सर, प्रदीप कानाल सर,सौजन्य महाडिक मॅडम, सिमीन काझी मॅडम यांनी केले.याच कार्यक्रमात पालक – शिक्षक संघाच्या वतीने हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.याच कार्यक्रमात कु.काजल सागवेकर हिने भरड धान्य या विषयावर सुंदर माहिती दिली.या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शेषेराव अवघडे सर,पर्यवेक्षक संतोष साळुंके सर,पालक शिक्षक संघाचे सहसचिव संजय उजगावकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख शशिकांत किंजळकर सर व सोमनाथ कोष्टी सर यांनी मेहनत घेतली.