संगमेश्वर:-द ग्लोबल व्हाईस,ब्लू टायगर सामाजिक संस्था मुंबई,व श्वेतगंध फाऊंडेशन सामाजिक परिवार संस्था डोंबिवली तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.सन-2023 च्या संस्थेच्या राज्यस्तरीय समाज रत्न सन्मान गौरव पुरस्कार संगमेश्वर तालुक्यातील कोंडअसुर्डे गावचे सुपुत्र उत्कृष्ठ,सूत्रसंचालक,निवेदक,आणि कबड्डी क्रीडा समालोचक श्री रोशन राजन शिंदे यांना देण्यात आला.
हा पुरस्कार वितरण सोहळा सहयोग मंदिर हॉल ठाणेच्या रंगमंचावर दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यामधील राज्यस्तरीय समाज रत्न समान गौरव पुरस्कार हा सामाजिक भान ठेवून आपल्या कार्य कर्तृत्वाने नाव लौकिक प्राप्त करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो .कित्येक विविध सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक,सांस्कृतिक,क्रीडा इत्यादी विविध मंचावर, श्री रोशन शिंदे यांनी उत्कृष्ठ सूत्रसंचालक, निवेदक,आणि संगमेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी होणाऱ्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा त्याठिकाणी उत्कृष्ठ समालोचक म्हणून निभावलेली भूमिका आणि दिलेले योगदान याची दखल या संस्थेने घेऊन त्यांची या पुरस्काराकरिता निवड केली.
यापूर्वी देखील रोशन शिंदे यांचा राष्ट्रीय सन्मान पदकाने,आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान विविध संस्थांनी केला आहे.सदरचा राज्यस्तरीय समाज रत्न गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री पद्मश्री पुरस्कार प्राप्त नयना आपटे यांच्या शुभ हस्ते रोशन शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
विविध व्यसपीठांवरती,रंगमंचावरती उत्कृष्ठ प्रभावी सूत्रसंचालक,निवेदक,आणि क्रीडा स्पर्धा याठिकाणी सामन्यांचे विस्तृत धावते वर्णन करण्याची क्षमता बाळगून असणारे समालोचक म्हणून नावलौकिक असणारे श्री रोशन शिंदे यांची या पुरस्काराकरिता निवड होऊन तो पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध स्तरातून श्री रोशन शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उत्कर्ष मंडळ मुंबई-कसबा देवपाठ वाडी यांच्या दामोदर हॉल येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी या मंडळाच्या वतीने देखील कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रत्नागिरी सिधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार सन्मानीय विनायकजी राऊत यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ,आणि पुष्प गुच्छ देऊन रोशन शिंदे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख रत्नागिरी जिल्हा सन्माननीय राजेंद्रजी महाडिक,संगमेश्वर चिपळूण विधान सभा मतदार संघाचे आमदार सन्मानीय शेखरजी निकम,संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती सन्मानीय सुजितजी महाडिक,आणि कसबा देवपाठ वाडी येथील सुप्रसिद्ध शक्तीवाले शाहीर किशोरजी चांदे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.