निवळी:-काही तासांपूर्वी साखरपा येथील दाभोळ घाटात रस्त्याच्या कडेला गॅस वाहू टँकर उतरला होता. यानंतर आता मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात दुपारी सवादोनच्या सुमारास टँकर उलटून अपघात झाला. आजच्या एका दिवसात गॅस टँकरच्या दोन घटना घडल्या आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
अपघातग्रस्त टँकर मुंबईच्या दिशेने जात होता. निवळी घाटात आला असता चालकाचा ताबा सुटून भर रस्त्यात केबिन आणि गॅस टँक वेगवेगळे झाल्याचे पाहायला मिळत आहे.सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून यामधील टँकरचालक बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा टॅबचे पोलीस कर्मचारी दाखल झाले असून रत्नागिरी येथून अग्निशामक दलाचा बंब देखील दाखल झाला आहे.