देवरुख:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक समितीमार्फत क्रांती दिनानिमित्त देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी देशभक्ती,स्वातंत्र्य,समता या मूल्यांबरोबरच एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये जाणून वागले पाहिजे, असे आवाहन केले.
या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेची सुरुवात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या नरवीरांना वंदन करून करण्यात आली. कु. गायत्री रामाणे व कु. सई नर आणि त्यांचे सहकारी या गटाने ‘वंदुनि हिंदमातेला’ या पोवाड्याचे सादरीकरण केले.
या स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी गट खालील प्रमाणे – प्रथम क्रमांक – कु. मयुरी कोटकर आणि ग्रुप (अकरावी कला),द्वितीय क्रमांक – कु. सई नर आणि ग्रुप (अकरावी वाणिज्य),तृतीय क्रमांक विभागून – कु. गायत्री रामाणे आणि ग्रुप (बारावी संयुक्त) आणि कुमारी वैभवी चव्हाण आणि ग्रुप (अकरावी संयुक्त).
या स्पर्धेचे परीक्षण प्रा.संदीप मुळ्ये व प्रा.गायत्री जोशी यांनी केले. या स्पर्धेनंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी ‘माझी माती – माझा देश’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शपथ दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सीमा कोरे, प्रा.स्वप्नाली झेपले,कु.देवयानी जोशी,प्रा. प्रवीण जोशी,प्रा. अभिनय पातेरे, प्रा.मयुरेश राणे यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सीमा शेट्ये यांनी मानले.