संगमेश्वर:- तालुक्यातील श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोळंबे या प्रशालेत क्रांतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिनानिमित्त प्रशालेत देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली.यामध्ये प्राथमिक गट,माध्यमिक गट व उच्च माध्यमिक गट अशा गटांत ही स्पर्धा झाली.प्राथमिक गटात प्रथम क्रमांक इ.६ वीच्या विद्यार्थ्यांनी पटकावला. माध्यमिक गटात प्रथम क्रमांक इ.९ वीने प्राप्त केला तर उच्च माध्यमिक गटातून १२ वीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या. मुलांचा उत्साह मोठया प्रमाणात दिसून आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्था सदस्य श्री. प्रथमेश मुळ्ये यांनी भुषविले. पर्यवेक्षक श्री. आर.व्ही. मुळ्ये,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. चव्हाण सर यांनी क्रांती दिनाची माहिती सांगितली. स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणा-या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करण्यात आले.गुरुकुल मुलांच्या वसतिगृहातील विदयार्थ्यांनी प्रोत्साहनपर देशभक्तीपर गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी पेटी साथ धीरज खापरे व ढोलकी साथ साहिल दुदम यानी दिली. परीक्षक म्हणून सौ. सानिका मुळये,श्री. जोशी,सौ.सीनकर यानी काम केले. या कार्यक्रमाचे संचालन श्री. चव्हाणसर, फोटाग्राफी श्री. बहिरम तर आभार सौ. रानभरे यांनी मानले.