चिपळूण:-केंद्रीय मंत्री रामदास आठवले ३ सप्टेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिय ( आठवले गट ) महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांनी दिली. या दौऱ्यात मंत्री आठवले यशोधननगर येथील ॲड . दयानंद मोहिते फाउंडेशन स्मारकाची पाहणी करतील.
त्यानंतर कापसाळ येथील स्व.लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे.याबाबत रिपाइं महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांनी सांगितले की , दयानंद मोहिते फाउंडेशनच्य इमारतीच्या भूमिपूजनाला आठवले सात वर्षांपूर्वी चिपळुणात आले होते येथे अत्याधुनिक डायलेसिस मशिन एमआरआय मशिन,सोनोग्राफी लायब्ररी जनतेच्या सुविधांसाठी मोफत उपलब्ध करण्यात येणार आहेत.
इमारत डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल.चिपळूणला आकाशवाणी प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे,ते पुन्हा सुर करण्यात यावे,अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात येणार आहे.
चिपळूणच्या विकासकामांसाठीही भरघोस निधी ते उपलब्ध करून देतील असे मोहिते यांनी सांगितले.