संगमेश्वर/इक्बाल पटेल:- फुणगुस येथील बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह मेढे मांजरे या ठिकाणी खाडीत सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार असे की, संजय महादेव कळंबटे (राहणार फुणगुस). हे रविवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी रेशन वर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले.मात्र खूप वेळ झाल्यावर ही ते घरी आले नाही.म्हणून घरातील व्यक्तींनी ठीक ठिकाणी शोध घेतला.मात्र ते सापडून आले नाही. सुमारे 2 दिवस उलटून ही संजय कळंबटे यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही.म्हणून 8 ऑगस्ट रोजी महेश कळंबटे यांनी पोलिस स्थानकात भाऊ बेपत्ता असल्याची माहिती दिली. यामध्ये त्यांनी माहिती देताना सांगितले की,माझा भाऊ संजय कळंबटे रेशन वर जातो असे सांगून घरातून बाहेर पडला,मात्र दोन दिवस उलटून ही तो घरी आला नाही.तसेच त्याला पॅरालाईस आजार असून एक हात आणि एक पाय काम करीत नाही. तसेच ते लंगडत चालतात.
ही माहिती मिळताच त्वरित डिंगणी पोलिस दुरक्षेत्राचे बीट अंमालदार श्री.पंधारे व सहकारी तांबे,त्याचबरोबर कळंबटे यांचे नातेवाईक व गावातील रहिवासी इलियास खान,सहिम खान, सरपंच अशोक पांचाळ यांना सोबत घेऊन शोध मोहीम सुरू केली.
खाडीपट्टा अक्षशः पिंजून काढला.आणि मेढे मांजरे येथे खाडीत संजय कळंबटे यांचा मृतदेह सापडला.मृतदेह खाडीत लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ सहीम खान,संतोष मोरे,सुनील मोरे,रवी मोरे यांनी होडीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी मेहनत घेतली.
संजय कळंबटे यांची ओळख पटल्यानंतर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनसाठी मृतदेह नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन फुणगुस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत अधिक तपास श्री.पंधारे करत आहेत.